मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना रत्नागिरीतील मुख्य कार्यक्रमाच्या वेळेत बदल
रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा रत्नागिरीतील मुख्य कार्यक्रम आता शनिवारी सकाळी १० ऐवजी दुपारी सव्वाबारा वाजता होणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ ८०० नागरिकांना मिळाला आहे. उद्या, शनिवार, दि. २६ एप्र
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना रत्नागिरीतील मुख्य कार्यक्रमाच्या वेळेत बदल


रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा रत्नागिरीतील मुख्य कार्यक्रम आता शनिवारी सकाळी १० ऐवजी दुपारी सव्वाबारा वाजता होणार आहे.

या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ ८०० नागरिकांना मिळाला आहे. उद्या, शनिवार, दि. २६ एप्रिल रोजी त्यांना घेऊन रेल्वेची विशेष गाडी अयोध्याकडे रवाना होणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमाच्या वेळेत बदल झाला असून, सकाळी १० ऐवजी आता दुपारी १२.१५ वाजता होणाऱ्या प्रमुख सोहळ्यास पालकमंत्री उदय सामंत तसेच अन्य लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. खेड रेल्वेस्थानकावरही दुपारी १२.३० ऐवजी नवीन वेळेनुसार दुपारी २.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande