रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
लक्ष्मी चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासून सुरू झालेल्या या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आणि छत्रपती संभाजीनगरच्या हर्षू ठाकूर यांचे भाषण झाले. जात-पात विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी