पाकिस्तानी सैन्य प्रमुखाचे कुटुंब देश सोडून पळाले
लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापला आहे.शिवाय केंद्र सरकारने सुद्धा पाकिस्तान विरुद्ध अनेक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.या सर्व कारवायांमुळे पाकिस्तानी सैन्यात प्रचंड घबराट पसरली आहे. यामुळे प
Pakistan army


लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापला आहे.शिवाय केंद्र सरकारने सुद्धा पाकिस्तान विरुद्ध अनेक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.या सर्व कारवायांमुळे पाकिस्तानी सैन्यात प्रचंड घबराट पसरली आहे. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आपल्या कुटुंबाला खासगी विमानाने परदेशात पाठवले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 48 तासांच्या आत भारताने युद्धनौका आयएनएस सूरतवरुन क्षेपणास्त्र चाचणी केली. यामुळे अरबी समुद्रात पाकिस्तानी नेव्हीला कडक संदेश मिळाला. याशिवाय, केंद्राने हवाई दल आणि सैन्याला तयार कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळेच पाकिस्तानी सैन्यात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी लष्करप्रमुखांसह पाकिस्तानच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खाजगी विमानाने ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. भारतातील सर्व राजकीय पक्षही या मुद्द्यावर केंद्र सरकारसोबत आहेत. पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत केंद्र सरकारने शेजारील देशासोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला. याशिवाय, अटारी-वाघा सीमेवरुन होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना 48 तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande