घटनेच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे
श्रीनगर, 26 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग करण्यात आले होते. यात मारल्या गेल्या 26 जणांपैकी 20 पुरुषांच्या पॅन्ट उतरवून त्यांचा धर्म तपासण्यात आल्याची धक्कादायक माहिती या घटनेच्या प्रारंभिक तपासात पुढे आली आहे.
तपासादरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी जिहादी दहशतवाद्यांनी आधी पर्यटकांकडे त्यांच्या धर्माची चौकशी केली नंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारले. दहशतवाद्यांनी पीडितांकडून आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्ससारखे ओळखपत्र मागितले. यानंतर पर्यटकांना 'कलमा' म्हणण्यास सांगितले आणि नंतर त्यांची पँट काढून त्यांचा खतना झाला होता का हे तपासून पाहिले. नंतर त्यांना जवळून गोळ्या घालून ठार मारले, काहींच्या डोक्यात तर काहींच्या छातीत गोळ्या झाडल्या. दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 25 हिंदू पुरुष होते.पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता सुरू आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही पाकिस्तानच्या विरोधात कडक कारवाई केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेवर गस्त वाढवली आहे. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने अधिक सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी