पहलगाम हल्ल्यानंतर मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी पोहचला काश्मीरला
श्रीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)।जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला.दरम्यान, या हल्ल्यानंतर काश्मीरला जाणाऱ्या पर्यटनांची संख्या आता घटली आहे.अशातच मराठीबरोबरच बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण
Atul kulkarni


श्रीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)।जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला.दरम्यान, या हल्ल्यानंतर काश्मीरला जाणाऱ्या पर्यटनांची संख्या आता घटली आहे.अशातच मराठीबरोबरच बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणारा अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरला गेला आहे. सोशल मीडियावर त्याने या बद्दल अपडेट शेअर करत नागरिकांना काश्मीरला वाचवण्याचे आव्हान केलं आहे.

अतुलने सोशल मीडियावर काही स्टोरीज शेअर केल्या आहेत.या स्टोरीजमध्ये त्याने विमानाचे फोटो शेअर करत तो काश्मीरला जात असल्याची माहिती दिली. त्याने म्हटलं की, चला काश्मीरला ! विमान माणसांनी भरून काश्मीरला जात होती. या विमानांना पुन्हा भरायचं आहे. आतंक को हराना है! अशी पोस्ट शेअर केली. याबरोबरच त्याने नागरिकांना काश्मीर वाचवण्यासाठी आव्हान केलं आहे.

अतुल कुलकर्णीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं आहे की,मी आजच मुंबईमधून पहलगामला जाण्यासाठी आलो आहे. जे काही घडलं ते खूप वाईट होतं. खूपच दुःखद घटना होती. मी विचार करत होतो की आपण काय करू शकतो. आपण फक्त सोशल मीडियावर लिहितो, सपोर्ट करतो. पण मी नक्की काय कृती करू शकतो असा विचार करत होतो. त्यावेळी मी वाचलं की नव्वद टक्के बुकिंग रद्द झाल्या आहेत. आता इथे फिरण्याचा सीजन आहे. काश्मिरीयत आपल्याला सांभाळली पाहिजे. काश्मिरी लोकांना आपल्याला सांभाळायचं आहे. पर्यटन फक्त व्यवसाय नाहीये तर त्यामुळे लोक एकमेकांशी जोडतात.

म्हणून मला संदेश द्यायचा आहे की जर आम्हाला आतंकवादाला हरवायचं आहे त्यावर जे उपाय आहेत ते प्रशासन करेल. पण आतंकवाद्यांनी हा हल्ला करून जो संदेश दिला की इथे येऊ नका त्यांना सांगायचंय की नाही आम्ही येणार. हे आमचं काश्मीर आहे. खूप मोठ्या संख्येने येणार. इथे अनेक लोक आहेत. तुम्ही इतर ठिकाणी कुठे बुकिंग केली असेल ती कॅन्सल करून तुम्ही इथे या. काश्मीरच्या लोकांना सांभाळणं गरजेचं आहे. जे काही घडलं ते खूप दुर्दैवी होतं. त्यांना माझ्याकडून श्रद्धांजली मी अर्पण करतो. पण घाबरणं सोडून आता सगळ्यांनी इकडे येणं गरजेचं आहे. असं तो म्हणाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande