WAVES -2025 परिषद
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सांस्कृतिक आणि दूरदर्शन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित WAVES 2025 ही परिषद भारताला जागतिक क्रिएटिव्ह हब म्हणून प्रतिष्ठित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी WAVES 2025 ल
Waves


माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सांस्कृतिक आणि दूरदर्शन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित WAVES 2025 ही परिषद भारताला जागतिक क्रिएटिव्ह हब म्हणून प्रतिष्ठित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी WAVES 2025 ला भारताच्या क्रिएटिव्ह शक्तीचे जागतिक प्रदर्शन म्हणून संबोधले आहे. या परिषदेमुळे भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता ‘वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, या भव्यदिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विविध विभागांचे मंत्रीमहोदय उपस्थित राहणार आहेत. WAVES 2025 (World Audio Visual & Entertainment Summit) ही परिषद भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

या परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत व महाराष्ट्र पॅव्हिलियन’ आणि वेव्हज प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा व सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिएटोस्पिअरचे उद्घाटन आणि ‘वेव्हज बझार’, वेव्हज एक्सलेटर इत्यादींचा प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद तसेच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होणार आहे. या परिषदेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

WAVES 2025 या परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.

Create in India Challenges: या उपक्रमांतर्गत 31 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, ज्यात 'Wah Ustad' (भारतीय शास्त्रीय संगीत स्पर्धा), 'Make the World Wear Khadi' (खादीसाठी जागतिक ब्रँडिंग), आणि 'Resonate: The EDM Challenge' (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक स्पर्धा) यांचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी दि. 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 या कालावधीत विविध क्षेत्रांमधून 80,000 हून अधिक उद्योजक, कलाकार, विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

WAVES Bazaar: हे एक जागतिक ई-मार्केटप्लेस आहे जे भारतीय कलागूणांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. फिल्म, गेमिंग, अॅनिमेशन, म्युझिक, कॉमिक्स आणि इतर क्षेत्रांतील निर्मात्यांना त्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन, निधी मिळवणे, आणि ब्रँड सहयोग साधण्यासाठी या डिजीटल मंचाचा विशेष उपयोग होणार आहे.

WAVEX Accelerator: मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी हे एक प्लॅटफॉर्म आहे जे मार्गदर्शन, निधी, आणि बाजार प्रवेश प्रदान करते.

CreatoSphere: तरुण कंटेंट निर्मात्यांसाठी हे एक इंटरएक्टिव्ह हब आहे, जिथे लाइव्ह स्पर्धा, मास्टरक्लासेस, आणि सहकार्य प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांना जागतिक स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

WAVES पुरस्कार : या पुरस्कारांमध्ये 'Game of the Year', 'Film of the Year', आणि 'Advertising Campaign of the Year' यांसारख्या श्रेणींचा समावेश आहे, ज्याद्वारे उत्कृष्ट नवनीन संकल्पनांचा सन्मान केला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी WAVES 2025 ला भारताच्या क्रिएटिव्ह शक्तीचे जागतिक प्रदर्शन म्हणून संबोधले आहे. या परिषदेमुळे भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

WAVES 2025 परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचे आयोजन होत असून या परिषदेत चर्चासत्रे, उद्योगक्षेत्रात गुंतवणूक आणि विविध कार्यक्रम होणार आहेत.

WAVES 2025 ही परिषद केवळ एक कार्यक्रम नसून, भारताच्या क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेच्या जागतिक मंचावर उभारणीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या परिषदेमुळे भारतीय कलाकार, स्टार्टअप्स, आणि उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला, नवकल्पना, आणि व्यवसाय सादर करण्याची संधी मिळेल. या परिषदेमुळे भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल आणि भारताला क्रिएटिव्ह हब म्हणून प्रतिष्ठा मिळेल.

उपसंचालक (माहिती)

कोकण विभाग, नवी मुंबई

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande