सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी सोलापुरातील १६९ जण गेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. जम्मू-काश्मीरमधील या पर्यटकांना सोलापुरात सुखरूप आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वयाची भूमिका बजाविण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांपैकी ४ जण आज सोलापुरात सुखरूप परतले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. त्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. यामध्ये सोलापुरातील कोण पर्यटक आहेत? याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले. या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नसल्याची खात्री झाल्यानंतर या पर्यटकांना जिल्ह्यात सुखरूप आणण्यासाठी नियोजन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड