नवी दिल्ली, ६ एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या समाज माध्यमावरील एका स्वतंत्र पोस्टमध्ये त्यांनी सांगितले :
सर्व देशवासीयांना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रभु श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा हा पावन व पुण्यदायी प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन चेतना आणि उत्साह घेऊन येवो, जो सशक्त, समृद्ध आणि समर्थ भारताच्या संकल्पाला सातत्याने नवीन ऊर्जा प्रदान करो. जय श्रीराम!
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी