बिजिंग, 9 एप्रिल (हिं.स.)।चीनमध्ये एक दुर्दैवी अपघात घडला आहे. चीनमधील हेबेई शहरातील एका नर्सिंग होममध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत २० जणांचा मृत्यू झाला आहे.या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, चीनमधील हेबेई शहरातील एका नर्सिंग होमला मंगळवारी(दि.८) रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत बुधवारी(दि.९)सकाळपर्यंत एकूण २० जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. स्थानिक वृतानुसार, इतर १९ जणांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये वृद्ध, महिला आणि मुले यांचा समावेश आहे. सरकारी माध्यमाने सांगितले की, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे परंतु याबद्दलची अधिक माहिती दिलेली नाही.पोलिसांकडून या आगीचे कारण तपासले जात आहे.
याच वर्षी जानेवारी महिण्यात चीनच्या हेबेई शहरातील झांगजियाकामध्ये एक फूड मार्केटमध्ये आग लागली. आग लागल्याच्या घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १५ लोक जखमी झाले होते. याआधी एक महिन्यापूर्वी पूर्व चीन मधील रोंगचेंग शहरात एक बांधकामाच्या ठिकाणी आग लागल्याने नउ लोकांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये बांधकाम नियमाविषयी डोळेझाकपणा आणि कार्यस्थळावर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेप्रती अनास्थेमुळे जीवघेण्या आगीच्या घटना घडत असतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode