फ्लोरिडा विद्यापीठातील गोळीबारात दोघांचा मृत्यू, ५ जखमी
वॉशिंग्टन, 18 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेच्या फ्लोरिडा युनव्हर्सिटीमध्ये गुरुवारी(दि.१७) गोळीबाराची घटना घडली.या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याविषयी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णाया
America florida college


वॉशिंग्टन, 18 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेच्या फ्लोरिडा युनव्हर्सिटीमध्ये गुरुवारी(दि.१७) गोळीबाराची घटना घडली.या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याविषयी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशियतला अटक देखील केली आहे.

गोळीबाराच्या घटनेविषयी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, “मृतांमध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी नव्हते ” जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. विद्यापीठाने अलर्ट जारी केला होता की विद्यार्थी संघटनेजवळ गोळीबार होत आहे आणि पोलिस घटनास्थळी प्रतिसाद देत आहेत. यानंतर, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या गाड्या तातडीने विद्यापीठाकडे रवाना झाल्या.

फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या टालाहासी कॅम्पसमध्ये स्टुडंट युनियनजवळ बंदूकधारी असल्याची माहिती मिळताच, संपूर्ण कॅम्पस तात्काळ लॉकडाऊन करण्यात आला. या कॅम्पसमध्ये ४२,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. खबरदारी म्हणून, सर्व विद्यापीठ वर्ग आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्पसमध्ये नसलेल्यांना तिथे जाऊ नका आणि त्या परिसरापासून दूर राहण्यास सांगितले. जर कोणाला मदत हवी असेल तर त्यांनी ९११ वर कॉल करावा किंवा फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी पोलिसांशी संपर्क साधावा.

संपूर्ण विद्यापीठात आपत्कालीन सतर्कता जारी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगण्यात आले. पहिल्या संदेशात विद्यापीठाने लिहिले की, “पोलीस घटनास्थळी आहेत किंवा लवकरच येतील. सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करा आणि त्यांच्या जवळ जाऊ नका.” नंतर आलेल्या अलर्टमध्ये असेही म्हटले होते की पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व लोकांनी आतच राहावे.

दरम्यान, या घटनेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांना गोळीबाराची संपूर्ण माहिती मिळाली आहे. “ही एक अतिशय दुःखद घटना आहे. दुर्दैवाने, अशा घटना घडत राहतात,” असे त्यांनी म्हटले आहे.तर फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि म्हणाले, “आमच्या प्रार्थना एफएसयू कुटुंबासोबत आहेत आणि राज्य पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande