भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी
संध्याकाळी 5 वाजेपासून लागू झाला निर्णय नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : भारत आणि पाकिस्तानमध्ये आज, शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून युद्धबंदी लागू झाली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून जल, जमीन आणि आकाशात युद्
भारत-पाकिस्तान लोगो


संध्याकाळी 5 वाजेपासून लागू झाला निर्णय

नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : भारत आणि पाकिस्तानमध्ये आज, शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून युद्धबंदी लागू झाली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून जल, जमीन आणि आकाशात युद्धबंदीवर सहमती झाल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात परराष्ट्र सचिव म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री ऑपरेशन (डीजीएमओ) सोमवारी 12 मे रोजी पुन्हा चर्चा करतील. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबत ट्विट करत सांगितले होते की भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, गेल्या 48 तासांत, जेडी व्हान्स आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि असीम मलिक यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी बोललो आहोत. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी तात्काळ युद्धबंदी करण्यास आणि तटस्थ ठिकाणी विविध मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.

तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सतत तणाव वाढत होता, त्यादरम्यान आता या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याचे जयशंकर यांनी अधोरेखित केले.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande