नवी दिल्ली,10 मे (हिं.स.) : देशातील वृत्त वाहिन्यांनी सिव्हील डिफेन्स सायरनचा वापर करू नये अशी सूचना केंद्र सरकारने आज, शनिवारी दिली.
केंद्र सरकारने सांगितले की सामाजिक जागरूकता मोहिमांव्यतिरीक्त त्यांच्या इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सिव्हिल डिफेन्स एअर रेड सायरनच्या आवाजाचा वापर करू नये. फायर सर्व्हिस
, सिव्हिल डिफेन्स आणि होम गार्ड्स महासंचालनालयाने दिलेल्या सल्ल्यानुसार, सिव्हिल डिफेन्स कायदा 1968 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत हे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या ऍडव्हायझरीनुसार सायरनचा नियमित वापर केल्यास, नागरिकांचा त्या सायरनकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन कमी होऊ शकतो आणि वास्तविक एअर रेडच्या प्रसंगी नागरिक त्याला प्रसारमाध्यमांची सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करू शकतात.सरकारच्या या सूचनेचा उद्देश, सुरक्षा सायरन्सबाबत नागरिकांमध्ये सजगता आणि संवेदनशीलता कायम ठेवणे असल्याचे सरकारने म्हंटले आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी