सोलापूर विद्यापीठाकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण !
सोलापूर, 10 मे (हिं.स.)। पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून ३१ मे रोजी लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या कार्यक्रमासाठी विद्या
PM Modi  Solparu Newsss


सोलापूर, 10 मे (हिं.स.)।

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून ३१ मे रोजी लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने स्मारक परिसरातील काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला २५ मेपर्यंत डेडलाईन दिली आहे.

विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोरील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळा परिसरात सध्या कोरीव काम सुरू आहे. त्यामागे मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर १५० फुटाचा (५० मीटर उंच) वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. याशिवाय अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी म्हणून त्याठिकाणी विविध चित्रे देखील असणार आहेत. या कामासाठी १४ कोटींचा निधी मंजूर असून त्यापैकी साडेसहा ते सात कोटी निधी अजून आलेला नाही. ३१ मे जवळ येत असल्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण मुदतीत सर्व कामे होतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande