मल्लकोट्टाई येथील दगड खाणीत झाला अपघात
चेन्नई, 20 मे (हिं.स.) : तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील मल्लकोट्टई येथे मेगा ब्लू मेटलद्वारे चालवल्या जाणाऱ्या दगड खाणीत भूस्खलन होऊन 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
यासंदर्भातील माहितीनुसार मल्लकोट्टाई येथील दगड खाणीत अचानक दगड आणि माती कोसळल्यामुळे झालेल्या मुरुगनंदम, अरुमुगम, गणेशन, अँडीचमी आणि हर्षित या 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 मृतदेह मिळाले असून एका जखमीला मदुराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे शिवगंगा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमी कामगारांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. याशिवाय, अपघातात जखमी झालेल्या आणि सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मायकेलला शक्य तितकी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी