सई ताम्हणकरच्या हस्ते 'हिम्मतराव टेलरिंग शॉप'चं उद्घाटन
मुंबई, 30 मे, (हिं.स.)। साताऱ्यात ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या झी मराठीवरील नव्या मालिकेच्या लाँच कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री 'सई ताम्हणकर' यांनी खास हजेरी लावली होती. संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होत कारण खास सई ताम्हणकर हिंमतरा
सई ताम्हणकरच्या हस्ते 'हिम्मतराव टेलरिंग शॉप'चं उद्घाटन


मुंबई, 30 मे, (हिं.स.)। साताऱ्यात ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या झी मराठीवरील नव्या मालिकेच्या लाँच कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री 'सई ताम्हणकर' यांनी खास हजेरी लावली होती. संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होत कारण खास सई ताम्हणकर हिंमतराव टेलरिंग शॉप चं उद्घाटन करायला आली होती. या कार्यक्रमाला संपूर्ण गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. गोपाळच्या संपूर्ण कुटुंबाने सईचे मनापासून स्वागत केले. गोपाळने स्वतः सईला कार्यक्रमस्थळी घेऊन येत आदराने तिचं स्वागत केलं.

हिम्मतरावांनी सईचे कौतुक करत सांगितल की, “महिलांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे, म्हणूनच मी माझा मुलगा गोपाळला स्वतःचं टेलरिंग शॉप सुरू करायला मदत केली.” या वेळी सरू आज्जीनेही आपल्या खास शैलीत संवाद साधत मजा आणली. तिचं बोलणं सगळ्यांनाच खूप भावलं.

सई सगळ्यांनी दाखवलेल्या प्रेमाने भारावून गेली. तिने गोपाळला सांगितलं, “तुझं काम खूप छान आहे. तू मुंबईत टेलरिंग शॉप सुरू कर ! मी तुझी पहिली ग्राहक असेन. तुझं नाव फिल्म इंडस्ट्री आणि फॅशन शोमध्येही फेमस होईल.” तिने सरू आज्जीचंही मनापासून कौतुक केलं आणि ती सरू आज्जीची फॅन असल्याचंही सांगितलं.

या कार्यक्रमात देवमाणूस – मधला अध्याय या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांच्यासोबत निर्माते संजय खांबे आणि श्वेता शिंदे हे देखील उपस्थित होते. 'श्वेता शिंदे यांनी परिधान केलेल्या ब्लाउजवर मागे देवमाणूस हे नाव खास शिवलेले होते.'

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande