पाकिस्तानात न्यायाधीशांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला, कॉन्स्टेबल ठार, गृहमंत्र्यांकडून निषेध
इस्लामाबाद, 31 मे (हिं.स.) - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील टांडो मस्ती पोलिस स्टेशन परिसरात न्यायाधीशांच्या सुरक्षा ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात एका कॉन्स्टेबलला आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात आणखी दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. गृहमंत्री मोहसिन नक्
पाकिस्तानात न्यायाधीशांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला, कॉन्स्टेबल ठार, गृहमंत्र्यांकडून निषेध


इस्लामाबाद, 31 मे (हिं.स.) - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील टांडो मस्ती पोलिस स्टेशन परिसरात न्यायाधीशांच्या सुरक्षा ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात एका कॉन्स्टेबलला आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात आणखी दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या हल्ल्याचा निषेध करत शोकाकुल कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली.

लरकाना-खैरपूर रस्त्यावर सत्र न्यायाधीशांच्या सुरक्षा ताफ्यावर काल, शुक्रवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. सुक्कूरहून लरकानाकडे जाताना सत्र न्यायाधीश सिमकन अहमद यांच्या ताफ्यातील पोलिस शिपाई मकबूल शेख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी इकबाल मिलानो आणि सगीर अहमद जखमी झाले. दरम्यान गृह मंत्री मोहसिन नकवी यांनी या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजी वायव्य पाकिस्तानमध्ये स्थानिक न्यायाधीशांच्या ताफ्यावर असाच हल्ला झाला होता. यामध्ये दोन पोलिस ठार झाले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये दहशतवाद्यांविरोधातील युद्धबंदीचे उल्लंघन केल्यानंतर पाकिस्तानात बंदी घातलेल्या दहशतवादी गट तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) कडून प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande