मनमाड, 9 मे (हिं.स.) : सध्या देशात पाकिस्तान विरुद्ध आहे भारतातील अनेक शहरांवर पाकिस्तानने मिसाईल व ड्रोन हल्ले केले मात्र हे सर्व हल्ले भारताने परतवून लावले असून पाकिस्तान सेमी लगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले तसेच मिसाईल टाकण्याचे काम सुरू आहे यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना मनमाड शहरातील अंकाई किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला हा आवाज व पोटाचा धक्का इतका भयंकर होता की याचे पडसाद मनमाड शहरापर्यंत तसेच येवल्याच्या नगरसुल अंदरसुल तसेच चांदवड तालुक्यातील मेसेनखेडे व आजूबाजूच्या परिसरात जाणवला जमीन इमारती हादरल्या यामुळे नेमके काय झाले हे समजले नाही मात्र नागरिकांनी भीतीपोटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पोलिसांनी देखील आवाजाच्या दिशेने धाव घेत तपास केला मात्र कुठेही काहीच आढळुन आले नाही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली मुंबई आय बी, एस आय डी यासह गोपनीय यंत्रणा यांनी तात्काळ पाहणी केली मात्र कुठेही काहीच आढळुन आले नाही यामुळे नेमका काय प्रकार घडला हे समजू शकले नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे सध्या देशात युद्धाची परिस्थिती असून देशातील पाकिस्तान बॉर्डर जवळ असणाऱ्या शहरात व गावात बॉम्ब हल्ला सुरू आहे यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षितता ठेवण्यात आली आहे याठिकाणी रॉकेट हल्ला ड्रोन हल्ला होऊन मोठ्या प्रमाणावर आवाज होत आहेत मात्र आज सकाळी मनमाड शहरातील अंकाई किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्या सारखा आवाज झाला हा आवाज इतका भयंकर होता की मनमाड शहरासह येवला चांदवड तालुक्यातील अनेक गावांत याचा आवाज आणि हादरे बसले यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले होते यामुळे नागरिकांनी पोलिसांना फोन करून सांगितले याची माहिती मुंबई पर्यंत जाऊन पोहचली आय बी एस आय डी गुप्तचर यंत्रणा यांच्यासह रेल्वे पोलीस व महाराष्ट्र पोलीस हेदेखील या आवाजाचा शोध घेउ लागले येवला तालुका ग्रामिण पोलिसांनी अंकाई किल्ला परिसर पिंजून काढला मात्र कुठेही काहीच आढळून आले नाही या भागात असलेल्या शेती तसेच खडी क्रशर यांच्याकडे विचारपूस करण्यात आली मात्र आम्ही कोणत्याही प्रकारचा स्फोट घडवला नाही असे त्यांनी सांगितलं याबाबत ग्रामस्थांना देखील विचारणा करण्यात आली मात्र आम्ही फक्त आवाज ऐकला तो आकाशातील रॉकेटचा होता की आणखी कसला हे आम्हाला समजले नाही यामुळे पोलीस देखील चक्राऊन गेले असून नेमका हा प्रकार काय याबाबत बराच वेळ शोध घेण्याची कार्य सुरू होते आवाज कशाचा होता,कोठून झाला याचा उलगडा झाला नसून आवाजाचे गूढ कायम आहे.आम्ही तपास करीत असून कोणतीही मोठीं घटना घडलेली नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलीसा तर्फे करण्यात आले आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI