पाकिस्तानने स्वतःच्याच नागरिकांना ढाल बनवले – व्योमिका सिंग
नवी दिल्ली, 09 मे (हिं.स.) : पाकिस्तानने गुरुवारी (8 मे रोजी) भारतावर ड्रोन हल्ला करताना आपले हवाई क्षेत्र बंद केले नव्हते. त्यावेळी पाकिस्तानात नागरी विमाने उडत होती. त्यांनी स्वतःच्या नागरिकांचा ढाल म्हणून उपयोग केल्याची माहिती विंग कमांडर व्योमिक
सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग


नवी दिल्ली, 09 मे (हिं.स.) : पाकिस्तानने गुरुवारी (8 मे रोजी) भारतावर ड्रोन हल्ला करताना आपले हवाई क्षेत्र बंद केले नव्हते. त्यावेळी पाकिस्तानात नागरी विमाने उडत होती. त्यांनी स्वतःच्या नागरिकांचा ढाल म्हणून उपयोग केल्याची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली. भारतीय संरक्षण दलातर्फे आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी कर्नल सोफिया कुरेशा आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री उपस्थित होते.

विंग कमांडर व्योर्मिका सिंग म्हणाल्या की, पंजाब सेक्टरमध्ये हाय एअर डिफेन्स अलर्ट आहे. आमचे हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी बंद आहे, परंतु पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात नागरी उड्डाणे सतत सुरू होती. तसेच गुरुवारी संध्याकाळी उशिरा हल्ला झाला तेव्हा कराची आणि लाहोरसारख्या प्रमुख शहरांमध्ये नागरी विमाने उड्डाण करत होती. या कृतीद्वारे पाकिस्तानने शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात घातले. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तराच्या कारवाईदरम्यान अत्यंत संयम दाखवला आणि प्रतिहल्ला मर्यादित ठेवला. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून भारतीय हवाई दल आंतरराष्ट्रीय नागरी हवाई सेवांचे संरक्षण करते. यादरम्यान विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल कुरेशी यांनी कराची आणि लाहोरमध्ये नागरी विमानांच्या उड्डाणाचे फोटो आणि त्यांची वेळ दाखवली.

यावेळी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी जम्मू विमानतळ, विद्यापीठ आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय एयर डिफेन्स सिस्टीमने प्रत्युत्तर देऊन ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले हाणून पाडले. तसेच, पाकिस्तानची देखरेख रडार प्रणाली पूर्णपणे नष्ट झाली. तसेच पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार करून 36 हून अधिक ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न झाले. बीएसएफने घुसखोरांना ठार करत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानने रात्रभर नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला, ज्यामध्ये काही सैनिक जखमी झाल्याचे कर्नल कुरेशी यांनी सांगितले.

दरम्यान नियंत्रण रेषेवरील सध्याच्या परिस्थितीमुळे, कर्तारपूर साहिब कॉरिडॉर सेवा रद्द करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande