धुळे, 1 जून (हिं.स.)।धुळे सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव शिवारात एक भीषण अपघात घडला आहे.भरधाव वेगाने जाणारी कार ट्रकला धडकून हा अपघात घडला आहे.या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे.तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.ही घटना रविवारी(दि.१) सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पी रमेश पी कृष्णा मूर्ती(४५) असे अपघातातील मृताचे नाव असून श्रीराम दहीता (२५) हा जखमी झाला आहे.
हैद्राबादहून शिर्डीकडे भरधाव वेगाने जाणारी इर्टीगा कार क्रमांक एपी ११ एटी ०४५५ चालकाला डूकली लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बीडकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक आरजे ३२ जीई ०२९१ ला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी रुग्णवाहिका व मदतनीस यांनी येऊन गाडीतून दोन्ही परप्रातीयांना बाहेर काढले आणि वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. अपघात झाल्यानंतर धुळे सोलापूर महामार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. गोंदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत करून वाहने बाजूला केली. या महामार्गावर अपघाताचे सत्र चालूच आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode