आयपीएल स्पर्धेचा समारोप समारंभात भारतीय सैन्यदलाला मानवंदना
अहमदाबाद, 3 जून (हिं.स.): आयपीएल २०२५ स्पर्धेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी स्टेडियमवर या स्पर्धेचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स
Ipl


अहमदाबाद, 3 जून (हिं.स.): आयपीएल २०२५ स्पर्धेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी स्टेडियमवर या स्पर्धेचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांचीही मोठी गर्दी झाली असून त्यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ पार पडला. या समारोप समारंभात भारतीय सैन्यदलाचा गौरव करण्यात आला आहे.

बीसीसीआयने यापूर्वीच घोषणा केली होती की आयपीएल २०२५ स्पर्धेचा समारोप समारंभ भारतीय सैन्यदलाला समर्पित करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याचा गौरव करण्यासाठी बीसीसीआयने खास योजना आखली होती. या सोहळ्यासाठी बीसीसीआयने तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांना निमंत्रित होते. मात्र ते या सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकलेले नाहीत.समारोप समारंभाची सुरुवात देशभक्तीपर गीतांवरील नृत्य सादरि‍करणाने झाले. त्यानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून देशभक्तीपर गाणी सादर केली. त्याचबरोबर हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतीही यावेळी पाहायला मिळाल्या.

एप्रिलच्या अखेरीस पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात २६ नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. त्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करण्यात आली.ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ९ दिवसांसाठी आयपीएल २०२५ स्पर्धाही स्थगित झाली होती.पण, नंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्याने तणाव कमी झाला. त्यामुळे पुन्हा आयपीएलला सुरुवात झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande