थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा
हैदराबाद, 1 जून (हिं.स.)।मिस वर्ल्ड २०२५ या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला. तर भारताची नंदिनी गुप्ता हि टॉप ८ मधून बाहेर पडली आहे. या स्पर्धेत जगभरातील अनेक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. ७२ व्या मिस
ओपल सुचाता चुआंगसरी


हैदराबाद, 1 जून (हिं.स.)।मिस वर्ल्ड २०२५ या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला. तर भारताची नंदिनी गुप्ता हि टॉप ८ मधून बाहेर पडली आहे. या स्पर्धेत जगभरातील अनेक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.

७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले शनिवारी(दि.३१) हैदराबादमध्ये पार पडले. या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं बाजी मारली. भारताची नंदिनी गुप्ता हिने जिंकण्यासाठी प्रयत्न केले. पण तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

सुचाता चुआंगसरी हिचा जन्म २० सप्टेंबर २००३ रोजी थायलंडमध्ये झाला. ती थाई मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धेची विजेती देखील आहे. मिस वर्ल्ड बनणारी ओपल सुचाता चुआंगसरी पहिली थाई महिला आहे, तिने तिच्या देशासाठी हा मुकुट जिंकला. यापूर्वी ती 'मिस युनिव्हर्स थायलंड २०२४' देखील राहिली आहे.

'मिस वर्ल्ड २०२५' चा मुकुट परिधान केलेली सुचाता चुआंगसरी स्टेजवर भावुक होताना दिसली. सुचाता सर्वांचे आभार मानताना हात जोडत होती. डोळ्यात अश्रू आणून ती हा क्षण अनुभवताना दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande