विमाना अपघातातील मृतांमध्ये सोलापुरच्या दोघांचा समावेश
सोलापूर, 13 जून (हिं.स.)। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान आज गुरूवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले आहे. या विमानात २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्स प्रवास करत होते. या दुघटनेत सर्व प्रवाशांसह ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या परिसरातील काही लोकां
विमाना अपघातातील मृतांमध्ये सोलापुरच्या दोघांचा समावेश


सोलापूर, 13 जून (हिं.स.)। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान आज गुरूवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले आहे. या विमानात २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्स प्रवास करत होते. या दुघटनेत सर्व प्रवाशांसह ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या परिसरातील काही लोकांचा मृत्यू झाला. यात विमानात बसलेले सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील हातीद गावातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

महादेव तुकाराम पवार व आशाबेन महादेव पवार अशी मृत पती-पत्नींची नावे आहेत. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा लंडनमध्ये असून दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande