सहकारी पत संस्थांच्या कर्मचा-यांचे एक दिवसीय प्रशिक्षण
अकोला, 13 जून (हिं.स.) महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण १८ जून रोजी सकाळी ९ वा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. महार
सहकारी पत संस्थांच्या कर्मचा-यांचे एक दिवसीय प्रशिक्षण


अकोला, 13 जून (हिं.स.) महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण १८ जून रोजी सकाळी ९ वा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार हे प्रशिक्षण पतसंस्था पदाधिकारी व नोकरदारांना अनिवार्य करण्यात आले असून, अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

पतसंस्थेतील काळानुरूप आव्हाने पेलण्याची क्षमता अधिकारी, कर्मचा-यांत निर्माण होण्यासाठी नाविन्यपूर्ण विषयाचे प्रशिक्षण महामंडळाद्वारे दिले जाते. प्रशिक्षणात थकित कर्ज वसुली प्रक्रियेसाठी घ्यावयाची दक्षता व कायदेशीर तरतुदी, पतसंस्थांचे सुधारित आर्थिक मापदंड, सायबर सिक्युरिटी ऑनलाईन गैरव्यवहार प्रतिबंध, डिजिटल अरेस्ट स्कॅम, क्रिप्टो करन्सी, अँटी मनी लाँडरिंग तरतूद व याबाबत पतसंस्थेने घ्यावयाची काळजी, संशयास्पद व्यवहारांचा शोध घेणे व त्याबाबत माहिती कळविणे, कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande