उत्तराखंड : हेलिकॉप्टर कोसळून 5 जणांचा मृत्यू
डेहराडून, 15 जून (हिं.स.) : उत्तराखंडमध्ये आज, रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राज्यातील रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 5 जण होते. या पाचही
हेलिकॉप्टर संग्रहित फोटो


डेहराडून, 15 जून (हिं.स.) : उत्तराखंडमध्ये आज, रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राज्यातील रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 5 जण होते. या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर प्रवाशांना घेऊन जात असताना पहाटे 5.30 वाजता गौरीकुंड परिसरात कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हेलिकॉप्टर अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी, 8 मे रोजी राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यात देखील एक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला होता.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande