नवी दिल्ली, 2 जून (हिं.स.) - राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - पदव्युत्तर (NEET PG २०२५) परीक्षा येत्या १५ जूनला घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र अतिरिक्त परीक्षा केंद्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाने (एनबीईएमएस) उपरोक्त परीक्षा तूर्तास स्थगित केल्या असून लवकरच सुधारीत तारीख जाहीर करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एनबीईएमएसला संपूर्ण पारदर्शकता आणि सुरक्षित परीक्षा केंद्रे सुनिश्चित करून एकाच सत्रात परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने एनबीईएमएसने न्यायालयाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधा वाढवण्याकरता काम करत आहे. पूर्ण पारदर्शकता राखली जाईल आणि सुरक्षित केंद्रे कार्यान्वित केली जातील याची खात्री करून परीक्षा एकाच सत्रात आयोजित करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी