आयपीएलचा अंतिम सामना ठरला टी-२० क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना
मुंबई, 20 जून (हिं.स.)।आयपीएलच्या १८ व्या हंगामात अनेक विक्रम प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता आणखी एका विक्रमाची भर पडली आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना हा टी-२० क्रिकेटच्या आतापर्यंत
Rcb vs panjb final match


मुंबई, 20 जून (हिं.स.)।आयपीएलच्या १८ व्या हंगामात अनेक विक्रम प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता आणखी एका विक्रमाची भर पडली आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना हा टी-२० क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला आहे.

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात आरसीबीच्या रुपात नवा चॅम्पियन संघ मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत करत १७ वर्षांचा दुष्काळ संपवून पहिली वहिली ट्रॉफी जिंकली. तर हा सामना आता टी-२० मधील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला आहे. यंदाच्या हंगामात टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकूण ८४० अब्ज मिनिटांपेक्षा अधिक वेळ चाहत्यांनी आयपीएल सामन्यांचा आनंद घेतल्याची नोंद झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यातील वॉच टइमचा आकडा हा ३१.७ अब्ज मिनिटे इतका आहे. टेलिव्हिजनवर अंतिम सामन्याला विक्रमी १६९ दशलक्ष प्रेक्षकांसह १५ अब्ज मिनिटे वॉच टाइमची नोंद झाली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर अंतिम सामन्याला ८९२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले, ५५ दशलक्ष पीक कॉन्करन्सी आणि १६.७४ अब्ज मिनिट वॉच टाइमसह यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धेतील लोकप्रियता आणखी वाढल्याचे समोर येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात डिजिटल प्लॅटफॉर्मवरील व्ह्यूअरशीपमध्ये २९ टक्के वाढ झाली आहे. स्टार स्पोर्ट्सने २५६ अब्ज मिनिटांचे कव्हरेज दिले.

भारत-पाक यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे स्पर्धात आठवडाभर स्थिगत करण्यात आली होती. त्याआधी यंदाच्या हंगामातील पहिल्या आठवड्यात ४९.५ अब्ज मिनिट वॉच टाइमसह स्पर्धेच्या सुरुवातीला सर्वाधिक व्ह्यूअरशीपच्या नव्या विक्रमाची नोंद झाली होती. विराट कोहलीच्या संघाने १७ वर्षांनी मिळवलेल्या विजेतेपदासह १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीमुळेही यंदाचा हंगाम खास ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande