मोरोक्को देशाचा ईदच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय
रबात, 3 जून (हिं.स.)।जूनच्या ६-७ तारखेला ईद-उल- अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाणार आहे.या दिवशी इस्लामचे अनुयायाकडून बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी दिली जाते.मात्र, आता 99 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इस्लामिक देश मोरोक्कोने ईदच्
Moroko city


रबात, 3 जून (हिं.स.)।जूनच्या ६-७ तारखेला ईद-उल- अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाणार आहे.या दिवशी इस्लामचे अनुयायाकडून बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी दिली जाते.मात्र, आता 99 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इस्लामिक देश मोरोक्कोने ईदच्या दिवशी बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी न देण्याचे आदेश जारी केले आहेत.

मोरोक्कोचे राजा मोहम्मद-VI यांच्या शाही फर्मानानंतर सुरक्षा दल देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून बकऱ्या शोधण्याचे काम करत आहे. ज्यांच्याकडे बकरी सापडेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व आहे. पण, आता थेट राजाने आदेश दिल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. देशात पसरलेल्या तीव्र दुष्काळामुळे प्राण्यांची संख्या कमी होत असल्याने मोहम्मद यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

या आठवड्यात येणारा बकरी ईदचा सण लोकांनी प्रार्थना आणि दान करून साजरा करावा आणि कुर्बानी टाळावी असे आवाहन मोरोक्कोचे राजा मोहम्मद- VI राजाने केले आहे. राजाच्या या निर्णयानंतर अधिकाऱ्यांनी जनावरांच्या विक्रीवर बंदी घातली असून, कुर्बानीसाठी गुप्तपणे आणलेल्या बकऱ्या घरातून जप्त करण्यात येत आहेत. मोरक्को सरकारने घेतलेल्या या निर्णयावर इतर मुस्लिम देशाने आक्षेप घेतला आहे. सरकार धार्मिक रीतिरिवाजांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप इतर मुस्लिम देश करत आहेत. पण, काही लोक सरकारच्या निर्णयाशी सहमतही आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande