अकोला, 30 जून (हिं.स.)।अकोला, दि. ३० : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे उद्या (१ जुलै) अकोला दौ-यावर आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : सकाळी ६.२० वा. अकोला रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी ९.४५ वा. डॉ. हेडगेवार रूग्णालय येथील डायलिसीस युनिटची भेट व पाहणी, सकाळी १०.३० वा. शुक्ला बाल रूग्णालयाला भेट व पाहणी, सकाळी ११ वा. स्माईल सुपरस्पेशालिटी रूग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती, सकाळी ११.३० वा. डॉ. शुक्ला यांच्या रामदासपेठेतील निवासस्थानी भेट, दु. १२ वा. डॉ. दीपक केळकर यांच्या रूग्णालयाला भेट, दु. १२.३० वा. जवाहरनगर येथे विजय देशमुख यांच्या निवासस्थानी भेट, सोयीनुसार मेहकरकडे रवाना.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे