अकोला, 30 जून (हिं.स.) : अकोला जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून 'महिला व बालविकास भवन' या नव्या जागेत स्थलांतरित झाले आहे.
या कार्यालयाबरोबरच जिल्हा बाल संरक्षण कक्षही महिला व बालविकास भवनात स्थलांतरित झाला आहे. या दोन्ही कार्यालयांचे नव्या जागेत दि. १ जुलैपासून कामकाज सुरू होईल. महिला व बालविकास भवन ही वास्तू माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयानजिक श्री संतोषी मातेच्या देवळालगत आहे. संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे