गरजू रुग्णांना वेळेवर दर्जेदार रुग्णसेवा मिळावी : आ. पठाण
अकोला, 30 जून (हिं.स.)। राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना वेळेवर दर्जेदार अशी वैद्यकीय सेवा मिळावी, सोबतच सद्यस्थितीत असलेली वैद्यकीय व्यवस्था ही आणखीन सुलभ व पारदर्शक व्हावी अशी सकारात्मक सूचना आ. पठाण यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र
P


अकोला, 30 जून (हिं.स.)। राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना वेळेवर दर्जेदार अशी वैद्यकीय सेवा मिळावी, सोबतच सद्यस्थितीत असलेली वैद्यकीय व्यवस्था ही आणखीन सुलभ व पारदर्शक व्हावी अशी सकारात्मक सूचना आ. पठाण यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधानभवनाच्या सातव्या मजल्यावर धर्मादाय रुग्णालयांच्या कार्यपद्धतीसंदर्भात पार पाडलेल्या बैठकीत दिल्या. या बैठकीत राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांना वेळेवर व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. धर्मादाय रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या संयुक्त समित्यांची कार्यपद्धती, निगराणी प्रक्रिया, तसेच पोर्टलवर माहिती अपलोड करणे, निधीचा खर्च आणि न्यायालयीन आदेशांचे पालन यावर सखोल विचारविनिमय झाला. या बैठकीस धर्मादाय समितीचे सदस्य आ. साजिद खान पठाण विशेष उपस्थित होते. त्यांनी रुग्णसेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी अनेक सकारात्मक सूचना मांडल्या. धर्मादाय आयुक्तांचाही या बैठकीत सहभाग होता. धर्मादाय रुग्णालयांच्या व्यवस्थापनात उत्तरदायित्व व पारदर्शकता आणण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरली आहे. राज्यातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी या उद्देशाने शासन प्रयत्नशील असून, ही बैठक धर्मादाय रुग्णालय क्षेत्रात आवश्यक सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande