अमरावती, 4 जून (हिं.स.)
धारणी तालुक्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हरिसाल वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये हरीसाल येथील इसम जलतन लाकडे आणण्याकरता गेला असता त्याच्यावर जंगलातील शेवरी मुंडा परिसरात वाघाने हल्ला चढून पूर्ण मासासह त्याला फस्त केले असून त्या ठिकाणी त्याच्या शरीरातील हाडाचे अवशेष व डोक्याचे खाल्लेले शीर एवढाच पुरावा वाघाने शिल्लक ठेवलां असल्याची माहिती समोर येत आहे तर मंगळवार ला नव्याने रुजू झालेल्या नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचाऱ्यांसमोर पेच निर्माण झालां असून शरीरातील हाडाचे अवशेष वैद्यकीय तपासणी करता प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे
मेळघाट व्याघ्र प्रकल्प गुगामल वन्यजीव विभाग अंतर्गत हरी साल वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावातील रहिवासी मुन्नू बाबला जावरकर वय 60 वर्ष हे रविवार लां हरीसाल वनपरिक्षेत्रातील जंगलामध्ये जाळण्यासाठी लाकडे आणण्याकरता घरून निघून गेले होते ते दोन दिवसा पासून घरी न परतल्या मूळे त्यांच्या पत्नी सह मुलांनी व नातेवाईकांनी परिसरात त्यांचा शोध घेतला परंतु ते आढलून आले नाही तर बुधवार ला सकाळी दहा वाजता त्यांचा शोध जंगलाकडे घेण्याकरिता नातेवाईक गेले असता त्यांचे कपडे व शरीरातील हाडाचे अवशेष व डोक्याचे शीर तेथे पडलेले दिसले त्याचा अंदाज घेत त्यांच्या नातेवाईका सह परिसरातील नागरिकांनी त्याच्यावर वाघाने हल्ला केल्याचा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
या घटनेची माहिती हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तेथे वाघाचे पगमार्क आढळून आले त्यामुळे सदर इसमावर वाघाचा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे त्या इसमाची हाडाची अवशेष वनविभागासह वैद्यकीय चमूंनी ताब्यात घेऊन ते प्रयोग शाळेत तपासणी करता पाठविण्यात आली असून नेमकी तीच व्यक्ती आहे का याचा शोध घेणे सुरू असून हरिसाल वनपरिक्षेत्रात मंगळवारी नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी रुजू झाल्याने त्यांच्यासमोर परिसरात घडलेली ही पहिलीच घटना असून व त्यांच्यासह वन कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेने पेच निर्माण केला आहे
आमदार काळे नी कुटुंबासह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची घेतली भेट
मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांना हरिसाल येथील मुन्नू बाबला जावरकर या इसामाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्याचे घर गाठून कुटुंबीयांची भेट घेवून घटनेची माहिती घेतली त्यासह हरिसाल वनपरिक्षेत्र कार्यालयात वनाधिकारी राहुल धाईत यांची भेट घेवून त्यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेऊन उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव त्यासह क्षेत्र संचालक वनविभाग अमरावती यांना नेहमी वाघाचे हल्ले वाढत असल्यामुळे वाघाला पकडण्याचे सूचना दिल्या आहे त्यासह कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून दहा हजाराची मदत सुद्धा त्यांनी केली आहे त्यांच्यासोबत गावातील माजी उपसरपंच गनेश येवले त्यांचे स्वीय सहायक आकाश खैरकर सह गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी