नगर - जोर्वे ग्रामपंचायत मधील गैरकारभार प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
अहिल्यानगर, 4 जून, (हिं.स.) :- जोर्वे ग्रामपंचायत मधील मासिक सभा व ग्रामसभा यांतील अनियमितता व एप्रिल 2022 ते मार्च 2025 मधील 15 व्या वित्त आयोगातून विविध कामांमध्ये वस्तू खरेदीत झालेल्या गैरकारभार या विरोधात जोरवे गावातील ग्रामस्थांनी पंचायत समिती त
जोर्वे ग्रामपंचायत मधील गैरकारभार प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक


अहिल्यानगर, 4 जून, (हिं.स.) :- जोर्वे ग्रामपंचायत मधील मासिक सभा व ग्रामसभा यांतील अनियमितता व एप्रिल 2022 ते मार्च 2025 मधील 15 व्या वित्त आयोगातून विविध कामांमध्ये वस्तू खरेदीत झालेल्या गैरकारभार या विरोधात जोरवे गावातील ग्रामस्थांनी पंचायत समिती तक्रार दाखल केली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले.

वास्तविकपणे केलेल्या तक्रारीची चौकशी एक महीन्याच्या आत होणे अपेक्षित असतांना जोर्वे ग्रामपंचायतीत झालेल्या अपहार व अनियमितता संदर्भात आपणाकडून संबंधितांना राजकीय दाबापोटी पाठीशी घातले जाऊ नये. संबंधितांकडून जोर्वे ग्रामस्थांना धमकाविण्याचे हाणामारी, दमदाटी शिवीगाळ असे प्रकार सुरू असुन कागदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सात दिवसाच्या आत वरील गैरव्यहाराची चौकशी न झाल्यास विद्यमान जोर्वे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पंचायत समिती संगमनेर येथे जन आंदोलन करुन उपोषणास बसणार आहे. असा इशाराही देण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande