रत्नागिरी, 4 जून, (हिं. स.) : येथील लायन्स आय हॉस्पिटलतर्फे येत्या गुरुवारी, दि. ५ जून २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लायन्स आय हॉस्पिटल जे. के. फाइल्स येथे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी करून घ्यावी असे आवाहन लायन्स आय हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी