नाशिक - मनसे कार्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झाले शिवसैनिक
नाशिक, 5 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाच्या नूतनीकरण निमित्ताने नासिक मध्ये मनसे आणि शिवसैनिक एकत्र आले असून मनसेच्या या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिक उत्स्फूर्ततेने सहभागी झाले आहे. पक्षाचे नेते ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस
नाशिक - मनसे कार्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झाले शिवसैनिक


नाशिक, 5 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाच्या नूतनीकरण निमित्ताने नासिक मध्ये मनसे आणि शिवसैनिक एकत्र आले असून मनसेच्या या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिक उत्स्फूर्ततेने सहभागी झाले आहे. पक्षाचे नेते ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस येतील पण नाशिक मध्ये देखील दोन्ही पक्षाचे सैनिक एकत्र आले आहेत.

एकेकाळी शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक हा एक गड होता. यावेळी राज्यामध्ये सर्वप्रथम नाशिक मधूनच तीन आमदार हे विधानसभेमध्ये निवडून आले होते. तर त्यानंतर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक हाती सत्ता घेतली होती त्यावेळी स्वतः राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये लक्ष घालून विकास करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पराभव झाला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीतही अधोगती झाली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुढे सरकू शकली नाही.

नाशिक मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणाच्या निमित्ताने सत्यनारायण पूजा आणि नवचंडी यज्ञ देखील करण्यात आला. पक्षाला चांगले दिवस यावे हा या पाठीमागचा हेतू असल्याचे प्रदेश पदाधिकारी दिनकर पाटील यांनी सांगितले.

या निमित्ताने डोंबिवली मध्ये झालेल्या आंदोलनानंतर नाशिकमध्ये मनसे आणि शिवसैनिक एकत्र आले . यावेळी शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक फोटोही आणला होता. त्यामध्ये 'हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र' असा उल्लेख केला होता. या फोटोवर उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता.

भारतीय जनता पार्टीने हिंदुत्व हिंदुत्व करत हिंदुत्वाचा अपमान केला असल्याचा आरोप यावेळी नाशिकच्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज असल्याचं मतही या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. मराठी माणसाच्या हितासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे हीच सर्वसामान्य माणसाची आणि कार्यकर्त्याची भावना असल्याचं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande