मध्यप्रदेश : भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू
झाबुआ, 04 जून (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री सिमेंटच्या ट्रकने व्हॅनला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताला बळी पडलेले लोक लग्नसोहळा आटोपून कारने घरी परतात असता
मध्यप्रदेशच्या झाबुआमध्ये भीषण अपघात


झाबुआ, 04 जून (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री सिमेंटच्या ट्रकने व्हॅनला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताला बळी पडलेले लोक लग्नसोहळा आटोपून कारने घरी परतात असताना हा अपघात घडला.

यासंदर्भातील माहितीनुसार थंडला-मेघनगर दरम्यान संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील वळणावर ट्रक आणि व्हॅनची धडक झाली. मृतांपैकी 8 जण थंडलाजवळील शिवगड महुदा येथील रहिवासी होते. तर आणखी एक मृत शिवगडजवळील गावातील आहे. मेघनगर येथे मंगळवारी रात्री राजस्थानहून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक इको व्हॅनवर उलटला. या अपघातात इको व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या 9 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमधून लोकांना बाहेर काढले. तपासणीनंतर डॉक्टरांनी 9 जणांना मृत घोषित केले, तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

झाबुआचे पोलिस अधीक्षक पद्मविलोचन शुक्ला या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितले की, रात्री 2 वाजताच्या सुमारास मेघनगर तहसील हद्दीतील संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील रस्त्यावरून ट्रक बांधकाम सुरू असलेला रेल्वे ओव्हर ब्रिज ओलांडत होता. तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो एका कारवर उलटला. ट्रक सिमेंटने भरलेला होता. कारमधील प्रवासी एकाच कुटुंबातील असून लग्न समारंभातून परतत होते.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande