पांगरेजवळील वडशिवणे शिवारातील वस्तीवर दरोडेखोरांचा थरार!
सोलापूर, 4 जून (हिं.स.)। घरातील सगळे गाढ झोपेत असताना मध्यरात्री दीडच्या सुमारास चौघेजण आत शिरले. त्यांनी झोपेतून जागे झालेल्या कांतिलाल मणेरी (रा. पांगरे, वडशिवणे शिवारात, ता. करमाळा) यांच्यावर चाकूने वार केले. त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली व
पांगरेजवळील वडशिवणे शिवारातील वस्तीवर दरोडेखोरांचा थरार!


सोलापूर, 4 जून (हिं.स.)। घरातील सगळे गाढ झोपेत असताना मध्यरात्री दीडच्या सुमारास चौघेजण आत शिरले. त्यांनी झोपेतून जागे झालेल्या कांतिलाल मणेरी (रा. पांगरे, वडशिवणे शिवारात, ता. करमाळा) यांच्यावर चाकूने वार केले. त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली व गळ्यातील गंठण, कर्णफुले, बोरमाळ, अंगठी व रोकड, असा एकूण चार लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शकील कांतिलाल मणेरी यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.पांगरी गावाजवळील वडशिवणे शिवारात वस्तीवर राहणारे कांतिलाल मणेरी, त्यांची पत्नी व मुलगा शकील हे तिघेजण सोमवारी जेवण करून झोपले होते. घराचे बांधकाम सुरू असल्याने ते पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते. झोपताना त्यांनी घराचा दरवाजा पुढे केला होता. मध्यरात्री दीडच्या सुमारास चौघेजण दरवाजा ढकलून घरात शिरले. त्यांनी कांतिलाल यांच्या नाकावर, गालावर, डोक्यात चाकूने वार केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande