चंद्रपूर, 6 जून (हिं.स.) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकरीतामुलांचे12 (चंद्रपुर - 2, राजुरा - 2, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) व मुलींचे 11 (चंद्रपुर - 2, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) असे एकूण23 वसतिगृह कार्यरत आहेत. सन2025-26 करीता रिक्त जागांवर प्रवेशाकरोता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीवर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. जिल्हास्तरावर चंद्रपुर येथे मुलांचे2 व मुलींचे2 असे एकूण4 वसतिगृह कार्यरत असून या वसतिगृहांमध्ये इयत्ता11 ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमांस प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार आहे. तसेच उर्वरीत19 वसतिगृहांमध्ये वर्ग8 वी पासून पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यात दिलेल्या कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी. वसतिगृहातील ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला अर्ज फक्त रिनीव्हल करायचा आहे, नविन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज भरलेल्या दिनांकापासुन आपण निवडलेल्या वसतिगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावे. वसतिगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 31 जुलैपर्यंत व व्यावसायीक अभ्यासक्रमांकरीता 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव