हिमानी भट्ट शिवपुरी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
अहिल्यानगर, 9 जून (हिं.स.)। ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंडच्या वतीने सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री हिमानी भट्ट शिवपुरी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गोवा येथील फर्न हॅाटेलमध्ये ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री हिमानी भट्ट शिवपुरी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान


अहिल्यानगर, 9 जून (हिं.स.)।

ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंडच्या वतीने सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री हिमानी भट्ट शिवपुरी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

गोवा येथील फर्न हॅाटेलमध्ये ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंडच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात उल्ले खनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा लोबल अवॉर्ड 2025 ने गौरव करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री हिमानी भट्ट शिवपुरी यांना ग्लोबल बुक ऑफ एक्सलेन्स, इंग्लंड चे उपाध्यक्ष डॉ दीपक हरके व अध्यक्ष डॅा मनिष कुमार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हिमानी भट्ट शिवपुरी या हम आपके है कौन या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. याचबरोबर त्यांनी राजा (1995), दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (1995), खामोशी (1996), हिरो नंबर 1 (1997), दीवाना मस्ताना (1997), बंधन (1998), कुछ कुछ होता है (1998), बीवी नंबर 1 (1999), हम साथ-साथ है (1999), कभी खुशी कभी गम... (2001) आणि मैं प्रेम की दिवानी हूं (2003) यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande