मुंबई, 11 जून (हिं.स.)।अभिनेत्री कतरिना कैफ कायम तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता कतरिना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.नुकतीच बॉलिवूडची हिरोईन कतरिना कैफ मालदीवची 'ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर' झाली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.
मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशनने (एमएमपीआरसी) मालदीवच्या 'ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर' ची घोषणा केली. कतरिना कैफला मालदीवच्या 'ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर' केल्यावर आपल्या भावना व्यक्त करत एमएमपीआरसीचे व्यवस्थापकीय संचालक थोयिब मोहम्मद म्हणाले, कतरिना कैफ मालदीवच्या 'ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर' असणे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मनोरंजन आणि उद्योगातील तिची लोकप्रियता आम्हाला जगभरातून भारतातून अधिकाधिक मालदीवमध्ये येण्यासाठी पर्यटनाचे आकर्षण वाढवण्यास मदत करेल.
मालदीवची 'ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर' झाल्यावर कतरिना कैफ म्हणाली की, मालदीवला निसर्ग सौंदर्यासोबत शांतता देखील आहे.सनी साईड ऑफ लाईफचा चेहरा म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मला अभिमान आहे. जगभरातील लोकांना मालदीवला जाण्यासाठी जागतिक दर्जाच्या ऑफर शोधायला मी उत्सुक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode