प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला निषेध
अकोला, 14 जुलै (हिं.स.)। गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही भ्याड तरुणांनी शाई फेक करून प्राणघातक हल्ला
P


अकोला, 14 जुलै (हिं.स.)।

गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही भ्याड तरुणांनी शाई फेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला या सर्वांवर कोठारात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे मागणीचे निवेदन नुकताच जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक आणि ऐतिहासिक सत्यांचा पुनर्विचार करून विचार मांडणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत अधिकार आहेत. परंतु सामाजिक संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला करत काळे फासले, ही घटना अत्यंत निंदनीय, असंविधानिक व लोकशाही मुल्यांना विरोध करणारी आहे.

प्रवीण दादांनी आजवर ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विचारपूर्वक भाष्य केले आहे. समाजातील वंचित घटकातील होतकरू तरुणांना रोजगाराचे एक मोठे व्यासपीठ त्यांनी तयार करून दिले आहे, त्यांचे विचार पटोत वा न पटोत, त्यावर प्रतिवाद करणे हे लोकशाही मार्गानेच व्हावे हीच संविधानाची अपेक्षा आहे, परंतु त्यांच्या वैचारिक भूमिकेला हिंसक विरोध करून त्यांना लक्ष्य करणे, हा सामाजिक अहिंसेच्या तत्त्वांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान आहे.

तरी, संभाजी ब्रिगेड अकोलाच्या वतीने आम्ही खालील मागण्या केल्या आहेत

सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी. अश्या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने जनजागृती मोहीम हाती घ्यावी. अशा हिंसक घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो म्हणून दोषींवर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी.

आपण याची गंभीर दखल घेऊन तातडीची कार्यवाही करण्यात यावी असा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड व जिल्ह्यातील इतर सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष देवानंद साबळे मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल पोहरे सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाश शिरसाठ मराठा पाटील समाज संघटना बाळापूरचे अध्यक्ष शरद पाटील वानखेडे भारतीय मराठा महासंघ संघटनेचे प्रेम पाटील संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष फिरोज खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande