उबाठा शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
नाशिक, 14 जुलै (हिं.स.)। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नवनिर्वाचित महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश के
उबाठा शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट


नाशिक, 14 जुलै (हिं.स.)।

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नवनिर्वाचित महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरे यांनी गिते यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खासदार संजय राऊत, सचिव मिलीद नार्वेकर, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वंसत गिते, जिल्हा संघटक निवृत्ती जाधव, उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, सचिव मसूद जिलानी, बाळासाहेब कोकणे, राहूल दराडे, सुभाष गायधनी, माजी नगरसेवक संतोष साळवे, महिला आघाडी संघटक स्वाती पाटील आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande