अमिताभ बच्चन यांनी 'येरे येरे पैसा ३' चा ट्रेलर शेअर करत सिनेमाला दिल्या शुभेच्छा
मुंबई, 2 जुलै, (हिं.स.)। ''येरे येरे पैसा ३'' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी ठाकरे आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या हस्ते लाँच करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता अमित
Yere yere paisa movie


मुंबई, 2 जुलै, (हिं.स.)। 'येरे येरे पैसा ३' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी ठाकरे आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या हस्ते लाँच करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला असून या सिनेमाला खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर शेअर केलाय. हा ट्रेलर अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर रिलीज केला आहे. All Good Wishes अशी पोस्ट लिहून बिग बींनी 'येरे येरे पैसा ३'ला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देणं आणि सिनेमाचं कौतुक करणं ही निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे 'येरे येरे पैसा ३' सिनेमाला नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही. अशाप्रकारे अमिताभ यांनी 'येरे येरे पैसा ३' सिनेमाचं कौतुक करुन शुभेच्छा दिल्याने हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे.

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. 'येरे येरे पैसा ३' हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande