'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातील आपल्या रोमँटिक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करणारे अभिनेता आर. माधवन यांनी कालांतराने आपल्या अभिनयात विविधता आणून स्वतःला सिद्ध केले आहे. आता तो पुन्हा एकदा 'आप जैसा कोई' या चित्रपटाद्वारे रोमान्सच्या जगात परतत आहेत. ज्यामध्ये ते अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत दिसणार आहेत. अलीकडेच माधवनने 'हिंदुस्थान समाचार'शी या चित्रपटाबद्दल खास बातचीत केली. या मुलाखतीतील काही विशेष अंश...
प्रश्न : तुमच्या मते चित्रपटांमधील रोमांसची व्याख्या आणि पद्धती किती बदलल्या आहेत?
होय, 'आप जैसा कोई' माझ्यासाठी अनेक दृष्टीने एक आव्हानात्मक चित्रपट ठरला आहे. मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात ‘रहना है तेरे दिल में’सारख्या रोमँटिक भूमिकेने केली होती आणि आज या टप्प्यावर आलो आहे. त्या काळात प्रेम व्यक्त करण्याची पद्धत अगदी वेगळी होती. ना डेटिंग अॅप्स होते, ना इतका मोकळेपणा. एखाद्या मुलीशी बोलायचं झालं, तर बऱ्याचदा तिचा पाठलाग करून भावना व्यक्त कराव्या लागत असतं, जे आजच्या काळात स्वीकारार्ह नाही. काळानुसार विचारसरणी आणि प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग बदलले आहेत आणि मला स्वतःलाही सतत बदलत राहावं लागलं आहे. या चित्रपटातली सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे मी वय दाखवू न देता असा दिसणं आणि माझी व को-स्टारची केमिस्ट्री खरी वाटणं. खरं सांगायचं तर मी खूप घाबरलो होतो. मी स्क्रीनवर योग्य दिसेन का? आमची जोडी जुळून येईल का? पण या घाबरण्यात एक नवीन थरार देखील होता.
प्रश्न : मुख्य कलाकारांमध्ये वयाचे मोठे अंतर असणे किती योग्य आहे?
मी माझ्या स्वतःच्या कुटुंबात अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत, जिथे पती-पत्नीच्या वयात १५ ते २० वर्षांचा फरक आहे, परंतु त्यांच्या नात्यात कधीही कमतरता जाणवली नाही. दोघेही एकमेकांशी आनंदी आहेत आणि शेवटी हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, आजच्या काळात अनेक कलाकार त्यांच्यापेक्षा खूपच लहान अभिनेत्रींसोबत काम करत आहेत. जोपर्यंत पडद्यावर त्यांची केमिस्ट्री प्रभावी आहे आणि काम चांगले आहे, तोपर्यंत प्रेक्षक देखील ते पूर्णपणे स्वीकारतात. वयापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे पात्र किती प्रामाणिकपणे आणि सच्चेपणाने निभावता.
प्रश्न : सिनेमाबद्दलच्या तुमच्या समजुतीबद्दल तुम्हाला काय सांगायचे आहे?
राजकुमार हिरानींसारखे सिनेेनिर्माता हे खरंच चित्रपटाचे जाणकार आहेत. मी स्वतःची त्यांच्याशी तुलना करण्याचा विचारही करू शकत नाही. खरं सांगायचं तर मी कधीही चित्रपटप्रेमी नव्हतो. 'आप जैसा कोई'चे दिग्दर्शक विवेक सोनी हे खरे चित्रपटप्रेमी आहेत, ते तर चित्रपटाचे पुजारी आहेत. मात्र माझ्या बाबतीत वेगळं होतं. ना मला चित्रपटांविषयी फारसं ज्ञान होतं, ना आकर्षण. मी कधीच विचार केला नव्हता की, मी अभिनेता होईन, ना कधी तशी इच्छा होती. सर्व काही योगायोगाने झाले. खरतर मी टीव्हीवर काम करायला सुरुवात केली ते केवळ दिवसाला तीन हजार रुपये मिळतील म्हणून! त्या काळात अनेक लोक फिल्म इंडस्ट्रीत यायचं स्वप्न पाहत होते, पण माझ्यात तशी अस्वस्थता नव्हती. कदाचित हीच सहजता प्रेक्षकांना आवडली आणि हळूहळू मला चांगल्या भूमिका मिळू लागल्या.
प्रश्न : तुम्ही तुमच्या कारकिर्दीत फारच निवडक चित्रपट का केले?, त्यामागील कारण काय?
मला पूर्वी वाटायचं की माझा सर्वाधिक चाहतावर्ग स्त्रियांमध्ये आहे, पण जेव्हा एके दिवशी मी इन्स्टाग्राम आणि ट्विटर अॅनालिटिक्स पाहिलं, तेव्हा धक्काच बसला. माझे ७५% फॉलोअर्स १८ ते ४० वयोगटातील पुरुष आहेत. मी ३० व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत आलो आणि 'रहना है तेरे दिल में'मध्ये रोमँटिक हिरो झालो तेव्हा मी ३२ वर्षांचा होतो. त्यावेळी वाटलं की जर मी सतत रोमँटिकच भूमिका करत राहिलो, तर लोक मला केवळ 'मनचला' समजतील. सुरुवातीच्या माझ्या तीनही चित्रपटांचे दिग्दर्शक मोठे होते, त्यामुळे इतरांना वाटलं की मी केवळ अशाच दिग्दर्शकांसोबत काम करतो किंवा मला फार सिनेमा समजतो. त्यामुळे अनेक संधी माझ्यापर्यंत आल्याच नाहीत. मग हळूहळी मला कळलं, मी कुठल्या टाईपचे सिमेने करत आहे? मी स्वत:ला प्रश्न विचारला मी काय करत आहे? मी एक गोल्ड मेडलिस्ट आहे, एक पब्लिक स्पीकर आहे, माझ्यात खूप काही आहे, पण माझ्या भूमिकांत ते कुठेच दिसत नव्हतं. तेव्हा मी ब्रेक घेतला, स्वतःला समजून घेतलं आणि एक खरा माणूस म्हणून परतलो. या प्रवासात मी विशेषत: विवेक सोनी यांच्यासारख्या दिग्दर्शकांचा खास आभारी आहे. ज्यांनी मला समजून घेतलं आणि 'आप जैसा कोई' सारख्या सिनेमात मला संधी दिली.
प्रश्न : सध्या तुम्ही चित्रपटांपेक्षा ओटीटी प्रोजेक्ट्सकडे का वळलात?
माझा प्राधान्यक्रम नेहमीच चांगल्या कथांकडे असतो. ओटीटीसाठी काम करणं सोपं नाही. जेव्हा आठ भागांची सिरीज बनवली जाते, तेव्हा त्यात खूप मेहनत आणि वेळ लागतो. ओटीटीचं माध्यम फिल्म्सपेक्षा वेगळं आहे. जर तुम्ही ओटीटीसाठी फिल्म करत असाल, तर त्याची स्क्रिप्ट अत्यंत मजबूत असावी लागते, कारण तिथे थिएटरसारखं व्हिज्युअल इम्पॅक्ट नसतो. जसं ‘शैतान’ आणि ‘केसरी’ मोठ्या पडद्यासाठीच बनले होते, त्याचा स्केल आणि इमोशनचा थिएटरमध्येच परिणाम दिसतो. पण ‘ब्रीद’सारखा शो थिएटरसाठी नाही. तर ओटीटीसाठी योग्य आहे. त्यामुळे मी आधी कथा आणि स्क्रिप्ट पाहतो आणि त्यानंतर ठरवतो की ती कोणता प्लॅटफॉर्म त्यासाठी सर्वात योग्य आहे. प्रत्येक कथेला एक योग्य माध्यम असतं.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी