माजी आमदार अपूर्व हिरे, प्रवीण माने, अनिल मादनाईक यांचा भाजपामध्ये प्रवेश
मुंबई, 2 जुलै (हिं.स.) - नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार अपूर्व हिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, इंदापूरचे प्रवीण माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण
प्रवेश


मुंबई, 2 जुलै (हिं.स.) - नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार अपूर्व हिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, इंदापूरचे प्रवीण माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आ. सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, राजेश पांडे, विजय चौधरी, ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी या प्रसंगी उपस्थित होते.

अपूर्व हिरे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. अपूर्व हिरे हे माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू आहेत. श्री. हिरे यांच्या बरोबर नाशिकच्या माजी नगरसेविका शिळा भागवत, तुळशीराम भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरलीधर भामरे, संदीप पवार आदी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. इंदापूर तालुक्यातील प्रवीण दशरथ माने यांच्या समवेत इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, हरणेश्वर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब चवरे, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेश जामदार, अमोल मुळे, अनिकेत इनामदार, बबनराव लावंड आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल मादनाईक यांच्यासमवेत स्वाभिमानीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे, शैलेश आडके, सतीश हेगाणा, सलीम पेंढारी, संजय पाटील, संदीप पुजारी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील (जि. कोल्हापूर) अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande