शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी; आगरी समाजाचे शासनाला निवेदन
कर्जत, 4 जुलै (हिं.स.)। अवकाळी पावसाने दुबार भातशेतीचे झालेले नुकसान आणि नंतर मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील शेती करणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.तसेच आगरी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावी प्र
शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी; आगरी समाजाचे शासनाला निवेदन


कर्जत, 4 जुलै (हिं.स.)। अवकाळी पावसाने दुबार भातशेतीचे झालेले नुकसान आणि नंतर मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील

शेती करणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.तसेच आगरी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेले नॉन क्रिमिलिअर दाखले जलदगतीने मिळावेत यासाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या वतीने शासनाला आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या वतीने तालुक्यात पावसामुळे झालेल्या शेतकरी संकटात आला आहे. त्यांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी कर्जत तहसील कार्यालयात जावून तहसीलदार डॉ. धनजंय जाधव यांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी संघटनेचे नेते वसंत कोळंबे,संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे,उपाध्यक्ष भगवान धुळे, शिवाजी कराळे,खजिनदार भूषण पेमारे,हिशोब तपासनीस सूर्यकांत चंचे तसेच अन्य पदाधिकारी मनोहर हजारे,अरुण ऐनकर, किशोर घारे,संचालक ॲड श्रीकृष्ण डुकरे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant


 rajesh pande