नगर - महापालिकेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अहिल्यानगर, 2 जुलै (हिं.स.) :- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा व त्या
महापालिकेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


अहिल्यानगर, 2 जुलै (हिं.स.) :- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा व त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षणाला प्रेरणा देणारा कार्यक्रम महिलां च्या पुढाकाराने पार पडला.

.माया कोल्हे म्हणाल्या की, शाळा कोणतीही असो, छोटी किंवा मोठी जिद्द व चिकाटी असेल तर विद्यार्थी यशस्वी होतो. सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य महापालिका शाळांच्या माध्यमातून होत आहे. या मुलांना घडविण्याचे कार्य शिक्षक वर्ग करत असल्याचे त्यांनी सांगितले.गीतांजली काळे यांनी शिक्षकां च्या कष्टाने भावी पिढी घडत आहे.या पिढीच्या भवितव्या साठी यशवंती मराठा महिला मंडळ प्रोत्साहन देण्याचे कार्य करत असल्याचे स्पष्ट केले.शीला शिंदे म्हणाल्या की, मुलां ना मिळालेल्या नवीन शैक्षणिक साहित्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. शिक्षणातूनच त्यांचे भवितव्य घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. शोभा भालसिंग यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार आत्मसात करण्याचे आवाहन केले.

सुरेखा खैरे म्हणाल्या की, शिक्षणाने प्रत्येकात एक आत्मविश्‍वास निर्माण होतो. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण ही यशाची पहिली पायरी ठरणार असल्याचे सांगून उच्च शिक्षण घेण्याचे त्यांनी सांगितले.मुख्याध्यापक विजय दिघे यांनी महिलांनी सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणासाठी उचलेला पाऊल कौतुकास्पद प्रेरणादायी असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व दिशा मिळणार असल्याचे सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande