नगर - जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सल्लागार समितीची बैठक संपन्न
अहिल्यानगर, 3 जुलै, (हिं.स.) : वंचित घटकांना औपचारिक वित्तीय सेवांमध्ये समाविष्ट करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांन
नगर - जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सल्लागार समितीची बैठक संपन्न


अहिल्यानगर, 3 जुलै, (हिं.स.) : वंचित घटकांना औपचारिक वित्तीय सेवांमध्ये समाविष्ट करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सल्लागार समितीची बैठक पार पडली.या वेळी जिल्हाधिका री डॉ. आशिया यांनी मार्गदर्शन केले.बैठकीस जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत आर्थिक समावेशन योजनां ची संपृक्तता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात विशेष उपक्रम म्हणून प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.या मोहीमेअंतर्गत सर्व खातेधारकांच्या केवायसी (KYC) पुनर्पडताळणीसह विद्यमान निष्क्रिय PMJDY खात्यांचे पुनरुज्जीवन, बँक खाती नसलेल्या प्रौढांसाठी नवी खाती उघडणे, तसेच PMJJBY (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना), PMSBY (प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना), आणि APY (अटल पेन्शन योजना) अंतर्गत नोंदणी यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण, दावा न केलेल्या ठेवींच्या पुनर्प्राप्तीसाठी मार्गदर्शन, व तक्रार निवारण प्रणाली याविषयी जनजागृती सत्रे घेण्यात यावीत, असेही त्यांनी सुचवले.या विशेष मोहीमेत उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि एनयूएलएम विभागाचे अधिकारी सक्रिय सहभाग नोंदवून बँकांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना PMJJBY, PMSBY आणि APY योजनांमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी बँक शाखा, शिबिरस्थळे व बँक व्यवसाय प्रतिनिधींनी गावोगावी जाऊन जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande