बाली, 3 जुलै (हिं.स.)
इंडोनेशियात ६५ जणांना घेऊन जाणारी एक फेरी बुडाली.
फेरी बुडाल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा
वाढण्याची शक्यता आहे. सध्या बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
अपघात
झालेल्या बोटीमध्ये ५३ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स आणि १४ ट्रकसह २२ वाहने होती. आतापर्यंत दोन मृतदेह
बाहेर काढण्यात आले आहेत आणि २० जणांना वाचवण्यात आले आहे. सुटका केलेल्यांपैकी
अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सुराबाया रेस्क्यू एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे
की, स्थानिक वेळेनुसार रात्री ११:२० वाजता
जहाज बुडाले. टगबोट्स आणि फुगवता येणाऱ्या जहाजांसह नऊ रेस्क्यू बोटी बेपत्ता
लोकांचा सक्रियपणे शोध घेत आहेत. दोन मीटर उंचीच्या लाटांमुळे बचाव पथकांना
लोकांना शोधण्यात अडचणी येत आहेत.
सर्व बेपत्ता प्रवासी सापडेपर्यंत प्रयत्न सुरू राहणार आहेत.
प्रवाशांनी भरलेली ही फेरी स्थानिक वेळेनुसार रात्री ११.२० वाजता
बाली सामुद्रधुनीत बुडाली. ती इंडोनेशियाच्या मुख्य बेट जावावरून एका प्रसिद्ध
पर्यटन स्थळाकडे जात होती.
जावास्थित एजन्सीने सांगितले की, बोटीच्या माहितीनुसार, एकूण ५३ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते.
जावामधील केतापांग बंदरातून प्रवास सुरू केल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने बोट
बुडाल्याचे सांगण्यात आले. ती बालीच्या गिलिमानुक बंदराकडे जात होती. जो ५० किलोमीटरचा प्रवास होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra