उबाठाच्या नाशिक प्रमुख पदी प्रथमेश गीतेंची नियुक्ती
नाशिक, 3 जुलै (हिं.स.)। उबाठा शिवसेना महानगर प्रमुख पदी माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतची माहिती पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटर द्वारे दिले आहे. चार दिवसांपूर्वीच नाराज असलेले विलास शिंदे यांना महानगर प्रमुख
उबाठाच्या नाशिक प्रमुख पदी प्रथमेश गीतेंची नियुक्ती


नाशिक, 3 जुलै (हिं.स.)। उबाठा शिवसेना महानगर प्रमुख पदी माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतची माहिती पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटर द्वारे दिले आहे.

चार दिवसांपूर्वीच नाराज असलेले विलास शिंदे यांना महानगर प्रमुख पदावरून हटविण्यात आले आणि त्यांच्या जागी उपजिल्हाप्रमुख मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर मामा राजवाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने त्यांना महानगर प्रमुख पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्या जागी भाजपामध्ये असताना उपमहापौर पद भूषविलेले माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र प्रथमेश गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विटर द्वारे दिले आहे

--------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande