बहुप्रतिक्षित ‘रामायणा’ चा टीझर अखेर प्रदर्शित
मुंबई, 3 जुलै, (हिं.स.)। नितीश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘रामायणा’ या पौराणिक चित्रपटाचा पहिला टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. सुमारे तीन मिनिटांचा हा टीझर भव्य दृश्य (VFX) आणि जडजंबाल संगीतात सजलेला आहे. टीझरमध्ये रणबीर कपूर भगवान श्रीरामच्या
बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चा टीझर अखेर प्रदर्शित


मुंबई, 3 जुलै, (हिं.स.)। नितीश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘रामायणा’ या पौराणिक चित्रपटाचा पहिला टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. सुमारे तीन मिनिटांचा हा टीझर भव्य दृश्य (VFX) आणि जडजंबाल संगीतात सजलेला आहे.

टीझरमध्ये रणबीर कपूर भगवान श्रीरामच्या रूपात तर यश रावणच्या रूपात पाहायला मिळतो. त्यांच्या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

चित्रपटातील भव्य सेट्स, युद्ध दृश्यं आणि पार्श्वसंगीत पाहता या कलाकृतीची भव्यता ‘Game of Thrones’ या हॉलिवूड मालिकेची आठवण करून देते. या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टीझरच्या शेवटी आपल्याला रणबीर कपूर भगवान रामच्या भूमिकेत आणि यश रावणच्या भूमिकेत एका झलक स्वरूपात पाहायला मिळतात. या दृश्यांसोबत हॉलीवूड संगीतकार हान्स झिमर आणि भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत असल्याने टीझरला एक जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.

टीझरची मांडणी ‘Game of Thrones’ मालिकेतील ओपनिंग क्रेडिट्सची आठवण करून देते. सुरुवातीला हिंदू धर्मातील त्रिदेव – ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांची ओळख करून दिली जाते आणि नंतर राम आणि रावण यांच्यातील युद्धाला “war to end all wars” म्हणजे सर्व युद्धांना समाप्त करणारे महायुद्ध म्हणून सादर केलं जातं.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande